
हरण टेकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सुरगाणा तालुक्यातील हरण टेकडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी एकत्र येत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच भास्कर पवार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी पांडुरंग जाधव यांनी संविधान निर्माते डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला परिणाम अधोरेखित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समता, न्याय आणि बंधुतेचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा अवलंब करून समाज प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच भास्कर पवार पांडुरंग जाधव, पंडित जाधव, सचिन बोरसे, राजू भरसट, लक्ष्मण भोये, मोतीराम भोये, सोमनाथ जाधव, वामन जाधव, केशव बोरसे, लक्ष्मण जाधव, मोतीराम जाधव, सुगंधाबाई पवार, भिमाबाई जाधव, संगिता पवार, भारतीबाई जाधव, यमुना जाधव, मंजुळा भोये, वंदना गावित (सीआरपी) यांच्यासह गावातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



