ब्रेकिंग न्यूज “नोटीसलाही ठेंगा! मारुतीपाडा शिंदे दिगर येथील सभामंडपाचे काम ठप्प; ठेकेदारावर कारवाईची मागणी”
मारुतीपाडा सभामंडपाचे काम रखडले; नोटीस देऊनही ठेकेदाराकडून दिरंगाई

ब्रेकिंग न्यूज
“नोटीसलाही ठेंगा! मारुतीपाडा शिंदे दिगर येथील सभामंडपाचे काम ठप्प; ठेकेदारावर कारवाईची मागणी”
मारुतीपाडा सभामंडपाचे काम रखडले; नोटीस देऊनही ठेकेदाराकडून दिरंगाई
सुरगाणा तालुक्यातील मौजे मारुतीपाडा, ग्रामपंचायत शिंदे (दि.) येथील सभामंडपाचे काम अद्याप सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने यांना काम तातडीने सुरू करण्याबाबत वारंवार तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.
याबाबत संबंधित विभागाने ठेकेदारास लेखी नोटीस बजावत, नोटीसच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत काम सुरू करून पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच मुदतीत काम सुरू न केल्यास करारातील अटी व नियमांनुसार कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र विभागाच्या नोटीसलाही न जुमानता ठेकेदाराने काम सुरू केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सभामंडपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, प्रशासन आता या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि रखडलेल्या कामाबाबत काय निर्णय घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.


