बोरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

बोरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शिंदे गटाच्या वतीने तालुका प्रमुख हरीभाऊ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख हरीभाऊ भोये, उपप्रमुख शिवाजी पवार, विद्यार्थी सेना प्रमुख उत्तम गांगोडे, तालुका संपर्क प्रमुख पंडित भोये, शेतकरी सेना तालुका प्रमुख पुंडलिक भोये, गट प्रमुख मोहन पिठे, शिव प्रमुख सागर ठाकरे, देविदास पिठे, गण प्रमुख हिरामण पिठे, नामदेव पिठे, प्रकाश जाधव, साहेबराव पिठे, हरीदास बागुल, वसंत पिठे, महिला प्रमुख विश्रांती गायकवाड, विजूताई गांगुर्डे, बोरगाव सरपंच अशोक गवळी, माजी सरपंच कल्पना भरसट, कपिल आहेर, राजेंद्र बागुल, कृष्णा हडस, निलेश आडस, अशोक ठाकरे, शिवाजी गांगुर्डे, रमण गांगुर्डे, सचिन चव्हाण, राहुल पवार, प्रकाश हाडस, काशीराम पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या विचारांचे पालन करून समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी बोरगाव बिटाचे पोलिस चारोस्कर व चौधरी आदी उपस्थित होते.



