# भरधाव ट्रॅक्टरची दोन वर्षीय चिमुकल्याला धडक; उपचारापूर्वीच मृत्यू रोकडपाडा येथे अपघात; चालकावर सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल, अपघातानंतर चालक पसार – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

भरधाव ट्रॅक्टरची दोन वर्षीय चिमुकल्याला धडक; उपचारापूर्वीच मृत्यू रोकडपाडा येथे अपघात; चालकावर सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल, अपघातानंतर चालक पसार

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

भरधाव ट्रॅक्टरची दोन वर्षीय चिमुकल्याला धडक; उपचारापूर्वीच मृत्यू

रोकडपाडा येथे अपघात; चालकावर सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल, अपघातानंतर चालक पसार

 

सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथे भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत दोन वर्षे दहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.२५ वाजता रोकडपाडा गावातील मनस्विनी किराणा दुकानासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. नरेंद्र मधुकर वासले (रा. रोकडपाडा) हा विना क्रमांकाचा इंडो फार्म 3035 DI ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व हयगयीने चालवत असल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या ट्रॅक्टरच्या धडकेत जिग्नेश प्रवीण गावित (वय २ वर्षे १० महिने) याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता कोणतीही खबर न देता तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी दिपाली जगन्नाथ गावित यांच्या फिर्यादीवरून सुरगाणा पोलिस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक 234/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(B) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184 व 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास PSI संग्राम अहिरे करीत आहेत.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!