संपादकीय
शिंदे दिगर येथे शिवरात्री यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

शिंदे दिगर येथे शिवरात्री यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती
रविवारी (दि.१५) शिंदे दिगर येथे सालाबादप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेसाठी परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
यात्रेदरम्यान विविध खाऊ, खेळणी तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यात्रेचा आनंद लुटला.
कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र खाडे, उपनिरीक्षक मनोज कुवर, चेतन बागुल, जगदीश घुटे, मांगू भोये, अनिल चारोस्कर व रमेश चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे यात्रा शांततेत व निर्विघ्न पार पडली.
यावेळी शिंदे दिगर गावातील ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.



