# म्हैसखडक येथे रुंद सरी-वरंबा तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेतीवर भर – आवाज जनतेचा
कृषी

म्हैसखडक येथे रुंद सरी-वरंबा तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेतीवर भर

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

म्हैसखडक येथे रुंद सरी-वरंबा तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल शेतीवर भर

सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना रुंद सरी-वरंबा तयार करणे आणि त्यावर टोकन पद्धतीने लागवड करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

सुरगाणा तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक शेतकरी शंकर गोविंदा गायकवाड आणि पूर्विदास आनंदा गायकवाड यांच्या शेतावर हे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे महत्त्व मंडळ कृषी अधिकारी अनिल भोर साहेब यांनी हवामान बदलाच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी “बेड” पद्धत कशी फायदेशीर ठरते, यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शून्य मशागत आणि आंतरपीक पद्धतीची माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी रोहिदास देशमुख यांनी टोकन पद्धतीचे फायदे स्पष्ट केले. या पद्धतीमुळे बियाण्यांची मोठी बचत होऊन पिकाची वाढ जोमदार होते, असे त्यांनी तांत्रिक बाबींसह समजावून सांगितले.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी समूह
सहाय्यक चेतन रोकडे आणि कृषीताई कल्पना चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. म्हैसखडक व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी उपस्थित होते.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!