# खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; बकऱ्या व कुत्रे फस्त, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी..! – आवाज जनतेचा
विशेष वृतान्त

खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; बकऱ्या व कुत्रे फस्त, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी..!

देवळा प्रतिनिधी - मनोज वैद्य

खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; बकऱ्या व कुत्रे फस्त, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी..!

देवळा तालुक्यातील खामखेडा येथे बिबट्याने शेतात शिरून बकरी व कुत्र्यावर हल्ला करून त्यांना फस्त केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामखेडा (ता. देवळा) येथील शेतकरी प्रभाकर बारकू शेवाळे यांच्या गट क्रमांक १६९ मधील शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून काही बकऱ्या व एक कुत्रा फस्त केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान, खामखेडा व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असून शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वनविभागाने नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा एकटे फिरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही केले आहे.

फोटो -संग्रहित आहे

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!