जनतेच्या आवाजाला यश; नाशिक–कनाशी बस सेवा पुन्हा सुरू!
बोरगावकरांना दिलासा; आठ-दहा दिवसांच्या अडचणीनंतर प्रवास सुरळीत

जनतेच्या आवाजाला यश; नाशिक–कनाशी बस सेवा पुन्हा सुरू!
बोरगावकरांना दिलासा; आठ-दहा दिवसांच्या अडचणीनंतर प्रवास सुरळीत
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेली नाशिक–कनाशी एस.टी. बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून बोरगाव व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. “आवाज जनतेचा” या पोर्टलवर बातमी प्रकाशित झाल्यानंतर संबंधित विभागाने याची दखल घेत तात्काळ बस सेवा पूर्ववत केली.
दररोज सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास बोरगाव येथे येणारी ही बस नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बस सेवा बंद झाल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता तसेच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
मात्र आता बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने कामगार, विद्यार्थी व रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी समाधान व्यक्त करत “आवाज जनतेचा” पोर्टलचे आभार मानले असून, प्रशासनाने यापुढेही अशीच तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



