बोरगाव येथे हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

बोरगाव येथे हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
बोरगाव (ता. सुरगाणा) श्री क्षेत्र बोरगाव येथील हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार (दि. २५ मार्च) ते शनिवार (दि. २८ मार्च २०२६) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामचंद्रांच्या पवित्र स्मृतींनी पावन झालेल्या या भूमीत आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतिल सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बुधवार (दि. २५) रोजी सकाळी ८.०१ वाजता ह.भ.प. आनंदा भरसट महाराज (हरणटेकडी) यांच्या हस्ते ब्रह्मविणा उभारून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री श्रीहरी कीर्तन तसेच त्यानंतर संगीत भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात विविध प्रवचनकार व कीर्तनकार सहभागी होणार असून बुधवार (दि.२५) रोजी ह.भ.प. रमेश महाराज (खरुडे), गुरुवार (दि.२६) रोजी ह.भ.प. कौशल्याताई देशमुख (बोरगाव), शुक्रवार (दि.२७) रोजी ह.भ.प. बळीराम महाराज (दत्तनगर) यांची कीर्तने होणार आहेत.
शनिवार (दि.२८ मार्च) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. नवनाथ महाराज शेलार (बहादुरी, ता. चांदवड) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
सप्ताहादरम्यान काकडा आरती, हरिपाठ, मृदंग, हार्मोनियम व भजनी मंडळांच्या सहभागातून विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांतील भजनी मंडळे व भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ, बचत गट व व्यापारी वर्ग, बोरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.



