# बोरगाव सीमा नाक्यावर ९.१४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

बोरगाव सीमा नाक्यावर ९.१४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; XUV 500 वाहनासह मुद्देमाल ताब्यात

बोरगाव सीमा नाक्यावर ९.१४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त


राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; XUV 500 वाहनासह मुद्देमाल ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बोरगाव (संजय नगर) सीमा तपासणी नाका कार्यालयाने परराज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ९ लाख १४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १ जून रोजी उंबरठाण–चुली रस्त्यावर चुली शिवारात वाहन तपासणीसाठी सापळा रचण्यात आला होता. यावेळी MH 15 EB 5970 क्रमांकाची महिंद्रा XUV 500 कार संशयास्पद आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले दमण, दीव व दादरा-नगर हवेली येथे विक्रीस असलेले विदेशी मद्याचे २६ बॉक्स आढळून आले.

या प्रकरणी वाहन चालक रवींद्र संजय भवर व त्याच्या इतर ज्ञात-अज्ञात साथीदारांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान मद्यसाठा, XUV 500 वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण ९,१४,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई निरीक्षक एस. ए. पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर तसेच जवान सुनील पाटील, अजय बगर आणि तेजस कसबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक एस. ए. पांचाळ करीत आहेत.

दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१९७४४ वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!