# कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक गौरव सन्मानासाठी हौसा चौधरी यांची निवड – आवाज जनतेचा
राजकीय

कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक गौरव सन्मानासाठी हौसा चौधरी यांची निवड

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक गौरव सन्मानासाठी हौसा चौधरी यांची निवड

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या अभिवादन दिनानिमित्त नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ, नाशिक यांच्या वतीने ‘साहित्य चमकता तारा – कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक गौरव सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. या सन्मानासाठी सुरगाणा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा वांझुळपाडा येथील उपशिक्षिका श्रीमती हौसा बाबुराव चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व उपक्रमशीलतेचा गौरव म्हणून निवड समितीने त्यांची निवड केली आहे. हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कविवर्य कुसुमाग्रज नगरी येथे प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास मान्यवर म्हणून तात्यासाहेब शिरवाडकर, डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित राहणार आहेत.
या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून श्रीमती चौधरी यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. कार्यक्रमास कुटुंबीय, मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सलादे, सरचिटणीस सतीश सोनवणे तसेच पदाधिकारी व विश्वस्त मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!