# साजोळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मधुकर गायकवाड सरपंचपदी विजयी साजोळे गावाचे प्रतिनिधित्व; ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

साजोळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मधुकर गायकवाड सरपंचपदी विजयी साजोळे गावाचे प्रतिनिधित्व; ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

साजोळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मधुकर गायकवाड सरपंचपदी विजयी

साजोळे गावाचे प्रतिनिधित्व; ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त

सुरगाणा तालुक्यातील साजोळे ग्रामपंचायत येथे नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत साजोळे येथील मधुकर गायकवाड यांची सरपंचपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत गायकवाड यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळवला.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच साजोळे व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार मधुकर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनीही नव्या सरपंचांकडून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या असून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!