# १५ हजारांची लाच घेताना भू-करमापकासह दलाल अटकेत – आवाज जनतेचा
संपादकीय

१५ हजारांची लाच घेताना भू-करमापकासह दलाल अटकेत

१५ हजारांची लाच घेताना भू-करमापकासह दलाला अटकेत

कळवण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू-करमापक सागर बापू वानखेडे याने जमिनीची मोजणी करून नकाशे देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भू-करमापकासह दलाल मुकेश प्रकाश पगार याला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका वर्षाच्या आत भूमी अभिलेख कार्यालयात घडलेली ही दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या वडीलोपार्जित शेतजमिनीच्या मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. त्यानंतर लोकसेवक सागर वानखेडे यांनी प्रत्यक्ष मोजणी करून हद्दखुणा केल्या. मात्र मोजणीचे नकाशे व आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी त्यांनी तक्रारदारास कळवण कार्यालयात बोलावून सातबारा उताऱ्यानुसार क्षेत्र मोजून नकाशे देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम १५ हजार रुपये ठरविण्यात आली.
ठरल्याप्रमाणे ही लाचेची रक्कम मुकेश प्रकाश पगार यांच्यामार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांनाही रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिनेश म. खैरनार, संजय ठाकरे आणि योगेश शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली. पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!