साजोळे येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

साजोळे येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा
ग्रामपंचायत साजोळे येथे शुक्रवारी ( दि.30) रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच प्रसंगी हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास गावातील उपसरपंच पुष्पा गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गायकवाड भोये, दत्तू गावित, काका गायकवाड, राजू गांगुर्डे, हरी गावित, काळू गांगुर्डे, नाथ चौधरी, लक्ष्मण गांगुर्डे, रंगनाथ गायकवाड, गोपीनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अधिकारी वैशाली देवरे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.