# सुरगाण्यात खैराचे २० नग जप्त, एकास अटक सुळे वांगण  शिवारात गुजरातमधील तस्करास अटक – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरीसंपादकीय

सुरगाण्यात खैराचे २० नग जप्त, एकास अटक सुळे वांगण  शिवारात गुजरातमधील तस्करास अटक

सुरगाण्यात खैराचे २० नग जप्त, एकास अटक

सुळे वांगण  शिवारात गुजरातमधील तस्करास अटक

 

सुळे (वांगण) शिवारात बेकायदेशीर लाकूड वाहतुकीचा गंभीर प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघडकीस आला. बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी व सहकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ७ वाजता सापळा रचला असता संशयिताची दुचाकी व चारचाकी वाहन (जीजे २१ एम ९७१५) जंगलाकडून येताना दिसले. चारचाकी वाहनास थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील दोघे वाहन सोडून जंगलात पळून गेले. मात्र दुचाकीस्वार वसंत काशीराम कहांडोळे (रा. मुरदड, ता. धरमपूर, जि. वलसाड) यास दुचाकीसह (जीजे १५ डीसी ५७९८) ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीच्या लाकडाचे २० नग आढळले. या लाकडाची किंमत ७ हजार ८४९ रुपये आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख १० हजार रुपये असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.ताब्यात घेतलेल्या संशयितास रविवारी दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईस पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कुवर यांच्यासह वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!