# ब्रेकिंग न्यूज, कार्यकारी अभियंत्यांच्या ट्रॅपने जिल्हा परिषद पुन्हा चर्चेत – आवाज जनतेचा
ताज्या घडामोडी

ब्रेकिंग न्यूज, कार्यकारी अभियंत्यांच्या ट्रॅपने जिल्हा परिषद पुन्हा चर्चेत

लाचखोर कार्यकारी अभियंत्यांच्या होत्या अनेक तक्रारी

कार्यकारी अभियंत्यांच्या ट्रॅपने जिल्हा परिषद पुन्हा चर्चेत

लाचखोर कार्यकारी अभियंत्यांच्या होत्या अनेक तक्रारी

 

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यासह एका कर्मचाऱ्यास लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. या ट्रॅपने जिल्हा परिषदेचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित कार्यकारी अभियंत्यांविरोधात दोन महिन्यांपासून प्रशासनाकडे तक्रारी होत्या. प्रशासनाने त्यांना तंबी दिली होती. मात्र, त्यांच्याकडून सुधारणा होत नसल्याने संतप्त ठेकेदारांनीच त्यांचा ट्रॅप केल्याची चर्चा रंगली आहे.

जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता ठाकरे यांनी जलयुक्त शिवार योजनेतील १५.९५ कोटी रुपयांच्या ५८ कामांचे निविदा प्रक्रियेत अनियमियता केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी निविदा रद्द करत नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या. नव्याने निविदा प्रक्रिया राबवताना अटी, शर्ती टाकण्यावरून वादंग झाले. आमदार हिरामण खोसकर यांनी तक्रारही केली. त्यावेळी प्रशासनाने मध्यस्ती केली. फाईल अडवणे, कार्यारंभ आदेश न देणे, पैशाच्या मागणीमुळे ठेकेदार जर्जर झाले होते. प्रशासनाकडे त्यांच्या कामाबाबत तक्रारी गेल्या होत्या. प्रशासनाने त्यांना सुधारणा करण्यास सुनावले होते. बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत विभागातही फाईल अडवणुकीचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे.

बरं झालं लई त्रास होता

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत हा प्रकार घडल्यानंतर अनेक ठेकेदारांनी बरं झालं लई त्रास होता. पैसे घेऊनही फाईल काढत नव्हती. अपमानस्पद बोलण्याचा त्रास होता, अशी प्रतिक्रिया ठेकेदारांत व्यक्त होत होती.

फटाके वाजवत आनंद
जुन्या जिल्हा परिषदेत लाच घेताना कार्यकारी अभियंत्यास अटक झाल्यानंतर काही ठेकेदारांनी फटाके वाजवत आनंद व्यक्त केल्याचे समजते. त्र्यंबक नाका परिसरातही फटाके फोडण्यात आल्याची चर्चा होती.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!