# सुरगाण्यात एकलव्य विद्यालयातील लाचप्रकरण; प्राचार्य सावळे ताब्यात – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

सुरगाण्यात एकलव्य विद्यालयातील लाचप्रकरण; प्राचार्य सावळे ताब्यात

नियमबाह्य बदलीप्रकरणी ५० हजारांची मागणी; एसीबीची कारवाई

सुरगाण्यात एकलव्य विद्यालयातील लाचप्रकरण; प्राचार्य सावळे ताब्यात

नियमबाह्य बदलीप्रकरणी ५० हजारांची मागणी; एसीबीची कारवाई

आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये लाच प्रकरण उघडकीस आले असून, प्राचार्य प्रशांत देवीदास सावळे यांच्यासह आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ही कारवाई केली. शाळेतील एका कर्मचाऱ्याची नियमबाह्य बदली झाल्याच्या तक्रारीवरून चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीतील सदस्यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
दिनांक २१ एप्रिल रोजी ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत प्राचार्य सावळे यांच्यासह आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!