# दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदालन खुले बाऱ्हे येथे स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथालयाचे उदघाटन – आवाज जनतेचा
आरोग्य व शिक्षण

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदालन खुले बाऱ्हे येथे स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथालयाचे उदघाटन

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदालन खुले
बाऱ्हे येथे स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथालयाचे उदघाटन

सह्याद्री पर्वतरांगांतील अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात नव्याने सुसज्ज ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या विद्यालयात इयत्ता अकरावी-बारावी कला शाखेचे वर्ग मागील १८ वर्षांपासून सुरू असून, परिसरातील १० ते १२ किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी पायी चालत शिक्षणासाठी येतात. आर्थिक परिस्थिती हलकी असल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके उपलब्ध होत नव्हती. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संस्थेमार्फत शालेय, स्पर्धा परीक्षा व संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती; मात्र पुस्तके ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हती.
ही गरज लक्षात घेऊन संस्थेचे ट्रस्टी यशवंत मोरे यांनी नाशिक येथील विंझीत टेक्नॉलॉजीचे संचालक संजय बरसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून विद्यालयाला ८ पुस्तक कपाटांची देणगी मिळाली. या सहाय्यामुळे विद्यालयात सुसज्ज असे मोठे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.
या ग्रंथालयाचे उद्घाटन बाऱ्हे पोलीस स्टेशनचे API प्रदीप गीते, न्यायाधीश सौ. निर्मल मॅडम, सरपंच वैशाली गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच परशराम वार्डे, हुशार देशमुख, देविदास गावित, त्र्यंबक ठेपणे, मनोज देशमुख, गोरख महाले, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ धूम, सदस्य प्रकाश धूम, पांडुरंग धूम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य संदीप व्यवहारे तसेच शिक्षक रमेश आहेर व शामराव उबाळे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची नवी दारे खुली झाली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!