# नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पळसन शाळेच्या मुली उपविजेत्या – आवाज जनतेचा
क्रीडा

नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पळसन शाळेच्या मुली उपविजेत्या

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पळसन शाळेच्या मुली उपविजेत्या

दिनांक 24 फेब्रुवारी 2026, मंगळवार रोजी नाशिक येथे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन 2025-26 अंतर्गत कबड्डी (मुली) प्रकारात सुरगाणा तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना PM SHRI जि. प. आदर्श प्राथमिक शाळा पळसनच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हा स्तरावर RUNNER UP ठरत संघाने तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.
संघाची कर्णधार नेहा गांगोडे हिने उत्कृष्ट आणि तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन करत संघासाठी सर्वाधिक गुण मिळवले. तिच्या नेतृत्वाखाली संघाने शेवटपर्यंत झुंज देत प्रभावी कामगिरी सादर केली.
संघाचे व्यवस्थापक विठ्ठल चौधरी सर यांनी नियमितपणे सकाळी लवकर शाळेत येऊन खेळाडूंचा सातत्यपूर्ण सराव करून घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संघाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरासाठी पात्रता मिळवली.
संघाच्या उत्साहवर्धनासाठी ग्रुप ग्रामपंचायत पळसनच्या लोकनियुक्त सरपंच रंजना चौधरी, उपसरपंच सुरेश गावित, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी भरसट यांनी खेळाडूंना ट्रॅकसूटचे वाटप केले. तसेच उलगुलान आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पांडुरंग पवार यांनी कबड्डीचे किट देऊन प्रोत्साहन दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत पळसनचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी खेळाडू विद्यार्थिनी व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!