शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी किसानसभेचे राज्यभर आंदोलन….* *दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार* माजी आमदार जे पी गावित*

*शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी किसानसभेचे राज्यभर आंदोलन….*
*दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार*
माजी आमदार जे पी गावित*
आज रोजी शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026… रोजी महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयी अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. *किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी आमदार कॉ जे पी गावीत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून सरकारने या शेतकरी आंदोलनाची दखल न घेतल्यास, आणि या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास लगेचच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे.*
पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यावर जे पी सिमेंट काँक्रेटसारखे आदर्शवत बंधारे बांधून स्थानिक शेतकऱ्यांना, खान्देश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, उद्योग धंद्यांना आणि तेथील औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे. अपूर्ण असलेले व गाळाने भरलेले बंधारे पूर्ण करावेत, केंद्र सरकारने 2006 साली लोकसभेत वनाधिकार कायदा मंजूर केला. त्या कायद्याला 20 वर्ष होऊन गेले मात्र अजूनही आदिवासीच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन दिली जात नाही, ती लाभधारकांना त्वरित द्यावी. स्वतंत्र सातबारा तयार करून दयावा. कब्जेदार सदरी पतीपत्नीचे नाव लावावे, इतर हक्कात वनविभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे, वन जमीन धारकांना मिळालेल्या जमिनीत केंद्र व राज्य सरकारच्या योजणांचा लाभ दयावा. यात विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर, या व इतर योजना द्याव्यात. उर्वरित फ़ॉरेस्ट प्लॉट धारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव ध्यावा, दोन हेक्टर पर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग चाळीस हजार रूपये बोनस देते. त्यांचप्रमाणे वनपट्टे धारकांनाही बोनस दयावा. आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व खात्यातील नोकरभरती त्वरित पूर्ण करावी. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती त्वरित करावी, जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पूर्णकरून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान थांबवावी. शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावे या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांना येत्या 17 जानेवारीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आंदोलन यशस्वी करण्याची हाक दिली आहे..



