अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम*

*अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम*
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम’ राबविण्यात येत आहे.हे मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रभावीपणे राबविली जाणार आहे.मोहिमेचा उद्देश सिकलसेल ॲनिमिया हा एक गंभीर आणि अनुवंशिक रक्तविकार असून या आजारामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बदलून कोयत्यासारखा (Sickle) होतो. परिणामी रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन रुग्णांना तीव्र वेदना, संसर्ग आणि जीवघेण्या गुंतागुंतींचा सामना करावा लागतो.0 ते 40 वर्ष वयोगटातील नागरिकांची तपासणी या विशेष अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.पुढील पिढीमध्ये या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी व्यापक तपासणी व जनजागृती हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.ग्रामीण रुग्णालयात खालील सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोफत तपासणी -0 ते 40 वर्ष वयोगटातील नागरिकांची सोल्यूबिलिटी टेस्ट तसेच निदानासाठी एच.पी.एल.सी. (HPLC) तपासणी.मोफत उपचार – सिकलसेलग्रस्त रुग्णांना हायड्रॉक्सीयुरिया, फॉलिक अॅसिड औषधे,समुपदेशन सेवा – विवाहपूर्व व प्रसूतिपूर्व समुपदेशनावर विशेष भर देऊन सिकलसेलग्रस्त बालकांचा जन्म टाळण्यासाठी मार्गदर्शन.ग्रामीण रुग्णालय सुरगाणा वैद्यकीय अधिक्षक डॉ संजय चौधरी यांनी सुरगाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः आदिवासी बांधवांना आवाहन केले आहे की, लग्नाआधी व लग्नानंतर प्रत्येक दांपत्याने सिकलसेल तपासणी करून घ्यावी.
सिकलसेल वाहक किंवा रुग्ण व्यक्तींनी विवाहपूर्व योग्य समुपदेशन घेऊन पुढील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. “



