# माजी आमदार जे पी गावितांचा आंदोलकांसमवेत रस्त्यावरच मुक्काम* – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

माजी आमदार जे पी गावितांचा आंदोलकांसमवेत रस्त्यावरच मुक्काम*

माजी आमदार जे पी गावितांचा आंदोलकांसमवेत रस्त्यावरच मुक्काम*

बोरगाव येथे दिनांक 17 जानेवारी 2026… पासून अखिल भारतीय किसान सभेचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नासाठी आणि रखडलेले प्रश्न निकाली काढन्यासाठी सहा ते सात हजार आंदोलक मुक्कामठोकून आहेत. **यात काल दिनांक 19 जानेवारी रोजी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉ जे पी गावित् यांनी स्वतः आंदोलकांसह बोरगांव चौफुली रस्त्यावरच अंथरून टाकून मुक्काम केला*
सुरगाणा तालुक्यातून पश्चिम समुद्राकडे वाहत जाणाऱ्या नार पार नदीवरील राक्षसीप्रकल्पा ऐवजी लहान धरणे बांधावी, या पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यावर जे पी सिमेंट काँक्रेटसारखे आदर्शवत बंधारे बांधून स्थानिक शेतकऱ्यांना, खान्देश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, उद्योग धंद्यांना आणि औद्योगिक वसाहतींना पाणी द्यावे. तालुक्यातील अपूर्ण असलेले बंधारे पूर्ण करणे व गाळाने भरलेले बोरगाव घोडांबे याबरोबर तालुक्यातील इतर बंधाऱ्यातील गाळ काढणे, लोकसभेत मंजूर झालेल्या वनाधिकार कायदा कायद्याला 20 वर्ष पूर्ण झाली. मात्र अजूनही आदिवासीच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची वन-जमीन त्यांना दिली जात नाही. स्वतंत्र सातबारा तयार करून दिला जात नाही. तो स्वतंत्र करुन द्यावा, कब्जेदार सदरी पतीपत्नीचे नाव लावावे, इतर हक्कात वनविभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे, वन जमीन धारकांना मिळालेल्या जमिनीत केंद्र व राज्य सरकारच्या योजणांचा लाभ दयावा. यात विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर, या व इतर योजना द्याव्यात. उर्वरित फ़ॉरेस्ट प्लॉट धारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव ध्यावा, दोन हेक्टर पर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग चाळीस हजार रूपये बोनस देते. त्यांचप्रमाणे वनपट्टे धारकांनाही बोनस दयावा. आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व खात्यातील नोकरभरती त्वरित पूर्ण करावी. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती त्वरित करावी, जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पूर्णकरून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान थांबवावी. शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावी. या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. यासाठी ठिय्या आंदोलन सुरु आहे. सरकार प्रश्न सोडवत नाही, प्रश्न निकाली काढले जात नाही. तोपर्यंत आंदोलक घरी जाणार नाहीत,असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलकांनी जेवणाचे साहित्य धान्य, चुलीसाठी लाकडं, अंथरून पांघरून आलेले असून, न्याय मिळाल्याशिवाय माघे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे, शासनाने शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलक मंगळवार किंवा बुधवारी नाशिककडे पायी निघणार आहेत. आणि *वेळ पाडल्यास पून्हा एकदा मुंबईकडे चाल करून पुन्हा आर पार चा लॉंग मार्च अधिक तीव्र होणार आहे.*
*यावेळी कॉ जे पी गावितांसह कॉ जनार्दन भोये, कॉ भिका राठोड, कॉ सावळीराम पवार, कॉ, वसंत बागुल, सुभाष चौधरी, भास्कर जाधव, पुंडलिक भोये भोये अशोक भोये पांडुरंग पवार, संदीप भोये, दिगंबर भोये, लक्ष्मण बोरसे, किसन दलजी भोये, कॉ हिरामण गावीत कॉ अशोक धूम, कॉ नितीन गावीत,चिंतामण गवळी, कॉ देवराम बागुल, कॉ संजाबाई खंबाईत चंद्रकांत वाघेरे, सुभाष शिंदे, गिरीश गायकवाड, धर्मा पवार, मधू जोपळे, पुंडलिक चौधरी, विजय घागळे, भगवान गांगुर्डे, हिरा गावीत, काळू भोये, लक्ष्मण पवार, रंगनाथ पवार, आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील सहा ते सात हजार नागरिकांनी बोरगाव येथे रस्त्यावर मुक्काम करून आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

 

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!