लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार…..*

*लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार…..*
प्रतिनिधी बोरगाव
सुरगाणा तालुका किसनसभेचे लाल वादळ आज संध्याकाळ पर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे. काल दिनांक 21 जावेवारी रोजी दुपारी तीन वाजता कॉ जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी लाल वादळा नाशिकच्या दिशेने निघाले होते, रात्री नऊ वाजता दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे मुक्काम पडला. आज साकाळी पुन्हा सुमारे सहा ते सात हजार आंदोलकांचे लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले आहे.
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांच्या रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, शिवाय दाखलही घेतली नाही, आंदोलकांची कोणतीही व्यवस्था केली नाही. जिल्हा प्रशासनाने तर शिष्टमंडळाला उडवा उडावी ची उत्तरे दिल्याने शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे शेतकरी नेते कॉ जे पी गावित यांनी संताप व्यक्त केला आहे. फसव्या आणि विश्वास घातकी सरकार विरुद्ध आर पार च्या लढाईत यावेळी मागे हटायचेच नाही, आपल्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करायचा असा पक्का निर्धार केल्याने नाशिक जिल्ह्यातून आंदोलकांची गर्दी वाढत चालली आहे.
सुरगाणा कळवण चांदवड आणि पेठ तालुक्यातील हजारो आंदोलक आज संध्यसकाळ पर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रसासनाची तारांबळ उडणार हे मात्र निश्चित आहे.
नाशिक जिल्हा प्रसासन काय भूमिका घेतय याकडे आंदोलकांचे लक्ष लागले असून, ठोस निर्णय झाला नाही तर संबंध नाशिक जिल्ह्याचे आणि पालघर ठाणे येथून निघालेल्या लॉंग मार्चचे लाल वादळ मुंबई च्या दिशेने निघणार असल्याचे कॉ जे पी गावित यांनी सांगितले आहे.



