# दादरा नगर हवेली–दिव दमण येथील विदेशी मद्याची महाराष्ट्रात अवैध वाहतूक; नाशिक उत्पादन शुल्काची धडक कारवाई, ११.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

दादरा नगर हवेली–दिव दमण येथील विदेशी मद्याची महाराष्ट्रात अवैध वाहतूक; नाशिक उत्पादन शुल्काची धडक कारवाई, ११.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दादरा नगर हवेली–दिव दमण येथील विदेशी मद्याची महाराष्ट्रात अवैध वाहतूक; नाशिक उत्पादन शुल्काची धडक कारवाई, ११.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दादरा नगर हवेली आणि दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात निर्मित व तेथेच विक्रीस अनुमती असलेल्या विदेशी मद्याचा साठा महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक २२/०१/२०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैतरणा बस स्टॉप चौफुली, पैतरणा–पोती रोडलगत, वैतरणा शिवार, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे सापळा रचण्यात आला.
दरम्यान, फोर्ड कंपनीची काळ्या रंगाची इकोस्पोर्ट (प्रादेशिक परिवहन क्रमांक GJ-06 HL-4318) आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता मधल्या व मागील बाजूच्या डिक्कीत लपवून ठेवलेला महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असा विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. वाहनाच्या मागील दरवाजातून एकूण ५८ बॉक्स, ५०१.८४ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत इकोस्पोर्ट चारचाकी वाहन, तीन मोबाईल फोन व विदेशी मद्य असा एकूण रु. ११,८१,०४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गु.र.क्र. ०९/२०२६ (दि. २२/०१/२०२६) नोंदविण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे—
अजय राजेंद्र हलपती (वय २८), रा. मोराई गाव, डोंगरी फलिया, ता. वापी, जि. वलसाड (गुजरात) पिन ३९६१९१.
राकेशभाई गणपतभाई हलयती (वय ३७), रा. मोहनगाव, धानवा फलिया, ता. उमरगाव, जि. वलसाड, पिन ३९६१०५.
तसेच सदर वाहनाचा मालक व अन्य ज्ञात-अज्ञात संशयित आरोपी फरार आहेत.
ही कारवाई मा. डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. प्रसाद सुर्वे (सहआयुक्त – अंमलबजावणी व दक्षता), व मा. सौ. उषा वर्मा (विभागीय उपआयुक्त, नाशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री. पी. एम. गौडा, दुय्यम निरीक्षक श्री. किरण चिंदळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान धनराज पवार, महेश सातपुते, युवराज रतवेकर, राहुल पवार, विलास कुवर, तसेच महिला जवान सुनीता महाजन यांचा सहभाग होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक किरण चिंदळे करीत आहेत.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!