# *उद्या सकाळी शेतकरी आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार.. माजी आमदार जे.पी. गावित* – आवाज जनतेचा
आपला जिल्हासंपादकीय

*उद्या सकाळी शेतकरी आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार.. माजी आमदार जे.पी. गावित*

*उद्या सकाळी शेतकरी आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार.. माजी आमदार जे.पी. गावित*

दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या एक दिवस आधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, संविधानाचा आधार घेत, महाराष्ट्र राज्याचे संघर्षमय शेतकरी नेते कॉ जे पी गावित वीस ते पंचवीस हजार आंदोलकांसह नाशिकच्या म्हसरूळ पासून मुंबई विधानभवनाकडे पायी पायी निघणार आहेत.
गेल्या सात दिवसापूर्वी अखिल भारतीय किसान सभेने शेतकरी आंदोलनाची हाक दिली, त्याप्रमाणे संबध नाशिक जिल्ह्यातील तालुका तहसीलवर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी जोरदार आंदोलने झाली. मात्र त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तालुका आणी जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तर उडवाऊडवीची उत्तरे देऊन हे विषय राज्य सरकारच्या अधिकारातले आहे असे सांगून अंग झटकले. कॉ जे पी गावित आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सहकार्य मिळाले नसल्याने बैठक निष्फळ ठरली.
याच धरतीवर रात्री उशिरा मार्कवादी काम्युनिस्ट पक्षाच्या जिल्ह्य कार्यकारिणी आणी सर्व तालुक्याची तालुका कार्यकारिणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिनांक 23 जानेवारी रोजी पिंपळनारे येथे आंदोलनाची पुढील दिशा ठराविण्यासाठी बैठक घेतली. बैठकीअंती एकमुखाने निर्णय घेत मुबंईकडे कूच करण्याचा निर्धार केला आहे.
प्रजासत्ताक दिन प्रजेच्या सत्तेचा दिवस म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो, पण आपल्या देशात प्रजेच्या हाती सत्ता नसून ती मूठभर लोकांच्या हाती आहे, त्यामुळे देशातील सर्वच नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी घरदार सोडून वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. आज आपल्यावरही ती वेळ आली आहे म्हणून जिल्ह्यातील गोर गरीब आदिवासी, बिगर आदिवासी नागरिक शेतकरी शेतमजूर कामगार युवक युवती महिला आज आपापल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून पायी पायी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
या नियोजन बैठकीत कॉ जे पी गावित यांनी कार्यकर्त्यांना सांगितले कीं ही संघर्षाची कसोटी पाहणारी लढाई आहे, वारंवार फसवनुक करणाऱ्या विश्वासघातकीं शासनाविरुद्ध लढायला आपण चाललो आहोत. आपल्या लढ्यासाठी आंदोलकांची शिस्त महत्वाची आहे, आपण सर्वांनी शिस्तीने आणी शांततेने पुढे चाल करून मुंबई गाठायची आहे.
मुंबईचे विधानभवन गाठायला पुढील सात ते आठ दिवस प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी आपली स्वतःची वाहने, पुरेल तेवढे अन्न धान्य,जेवणाचे साहित्य, भांडे, कपडे, सरपण, आरोग्यासाठी गोळ्या औषधे मुबलक प्रमाणात घ्यावित. आंदोलक बांधव सुरक्षित राहावे यासाठी पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडे शंभर लोकांची जबाबदारी याप्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडतील, कोणत्याही आंदोलकावर संकट येणार नाही याची काळजी प्रमुखकार्यकर्ता व इतर दहा प्रमुखांनी ती जबाबदारी स्वीकारायची आहे, वेळोवेळी या गट प्रमुखांना शेतकरी आंदोलनाची प्रमुख टीम नियोजनाबाबद मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे नियोजन करावे. कोणत्याही व्यक्तीला, वाहणाला, विध्यार्थ्यांना, ऍम्ब्युलन्सला अडथळा न आणता प्रत्येकाने सहकार्य करून आपली शिस्त दाखवायची आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली भूमिका चोख पार पाडली तर हे आंदोलन यशस्वी होईल, शासनाला आंदोलकांसमोर झूकावे लागेल. रास्त मागण्या असल्याने शासन आंदोलकांना योग्य न्याय देईल. असे आवाहन कॉ जे पी गावित यांनी उपस्थितांना केले.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!