विशेष वृतान्त
दांडीची बारी–माणी गाव रस्ता रविवारी वाहतुकीस बंद

दांडीची बारी–माणी गाव रस्ता रविवारी वाहतुकीस बंद
दांडीची बारी ते माणी गाव या मार्गावर रविवार दि. २५/०१/२०२६ रोजी डांबर पसरविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर रस्ता सकाळपासून पूर्णतः वाहतुकीस बंद राहणार आहे.
सदर कामामुळे या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही कळवण्यात आले आहे.



