चिंचपाडा येथे आयोजित प्रो कबड्डीत राशा येथील ठाकरे किंग संघास विजेतेपद

चिंचपाडा येथे आयोजित प्रो कबड्डीत राशा येथील ठाकरे किंग संघास विजेतेपद
चिंचपाडा येथे प्रो कबड्डी लीग आयोजित करण्यात आली होती. यात १२ संघानी सहभाग घेतला होता. राशा येथील ठाकरे किंग संघाने कबड्डी लीग मध्ये विजेतेपद पटकावत ३० हजार रुपये रोख व ट्रॉफी मिळविली आहे.
चिंचपाडा येथे आयोजित चिंचपाडा कबड्डी लीग मध्ये तालुक्यातील १२ संघाने सहभाग नोंदवला. दोन दिवसीय स्पर्धा होती. स्पर्धेत उपविजेतेपदाचा वाघधोंड येथील संघाने मिळवत २० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. निंबारपाडा येथील संघाने १० हजार रुपयांचे बक्षीस मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. दिंगबर हाडस, नितीन चौधरी यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली. आयोजक म्हणून मनोहर चौधरी, किशोर चौधरी, गंगाराम गांगुर्डे, गणेश चौधरी हे होते. लीग यशस्वी होण्यासाठी चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
–
मॅन ऑफ द सिरीज हर्षद गवळी (ठाकरे किंग), बेस्ट रेडर प्रकाश देशमुख (वाघधोंड), बेस्ट डिफेंडर तुषार देशमुख (वाघधोंड) यांना विशेष बक्षीस देण्यात आले.


