हरणगाव येथे ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय प्रजासत्ताक दिनी एकल मातेच्या हस्ते ध्वजारोहन; सामाजिक सन्मानाचा प्रेरणादायी संदेश”

*“हरणगाव येथे ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय प्रजासत्ताक दिनी एकल मातेच्या हस्ते ध्वजारोहन; सामाजिक सन्मानाचा प्रेरणादायी संदेश”
प्रतिनिधी बोरगाव
*हरणगाव, ता. पेठ (दि. 26 जानेवारी 2026): प्रजासत्ताक दिनानिमित्त हरणगावात ग्रामपंचायत कार्यालय, माध्यमिक विद्यालय हरणगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या तिन्ही ठिकाणी एकल मातांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत हरणगाव बारवपाडा येथे श्रीमती सीताबाई मनोहर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.* *त्यानंतर माध्यमिक विद्यालय हरणगाव येथे श्रीमती नंदाताई दिलीप महाले यांनी ध्वज फडकावला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती सुलोचना नंदराज वाघमारे व श्रीमती पुष्पा देविदास जाधव , श्रीमती मीरा भाऊराव वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.*
*या दिवशी सकाळी हरणगावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी “साक्षर गाव” घडविण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली.*
*कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात व गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांना प्रेरणादायी सन्मान म्हणून माध्यमिक विद्यालय हरणगावचे मुख्याध्यापक धनंजय चव्हाण सर यांना “स्मार्ट ग्राम आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.*
*या कार्यक्रमासाठी हरणगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पल्लवीताई विजय भरसट, उपसरपंच हिम्मत भोये, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गायकवाड, किरण जाधव, संगीता ठेपने, अलका जाधव, कचराबाई बदादे, सावित्रा सहारे, ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड, पोलीस पाटील निवृत्ती पवार, ग्रामविकास समिती अध्यक्ष युवराज पवार, तसेच गोवर्धन जाधव, विजय भरसट, विश्वनाथ ठेपने, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ओम प्रकाश वाघमारे , वेणूताई जाधव, जनाबाई जाधव, लक्ष्मण टोपले, माजी सरपंच रेखाताई गायकवाड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*देशाच्या गौरवशाली दिनी एकल मातांना समाजातून सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे व त्या आत्मनिर्भर व्हाव्यात या उद्देशाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. गावाच्या विकासात महिलांची सक्रिय सहभागिता वाढवून त्यांना आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम पेठ तालुक्यात हरणगावने उभा केलेला एक आदर्श ठरत आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातून आनंद व प्रशंसेचा वर्षाव होत आहे.*



