# उंबरठाण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – आवाज जनतेचा
संपादकीय

उंबरठाण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

उंबरठाण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण परिसरात आज शुक्रवार (दि.६) रोजी सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
निंबारपाडा, चूली, बेहुडणे, वडपाडा, दरापाडा, फणसपाडा, काटीपाडा, झुंडीपाडा, दोडीपाडा, मोळविहिर आणि शिवपाडा या गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. धक्का बसताच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर येत सुरक्षित ठिकाणी थांबणे पसंत केले.
दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.
याबाबत सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांनी माहिती देताना सांगितले की, उंबरठाण परिसरातील निंबारपाडा येथे सकाळी ९.५८ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!