**पळसन येथील तलाठी कार्यालयाचे काम निकृष्ट दर्जाचे
ठेकेदारावर कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी
सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे सुरू असलेल्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासकीय निधीतून होत असलेल्या या कामात दर्जाकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असून, अवघ्या काही दिवसांतच कामातील दोष स्पष्टपणे दिसून येत आहेत.
इमारतीच्या बांधकामात हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून दगड गोटे वापरण्यात आले आहे. कामाची गुणवत्ता तपासण्याकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासनाच्या मालमत्तेशी असा हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
तसेच या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषी ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे व दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.