# नाशिकमध्ये परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त; ५.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत – आवाज जनतेचा
संपादकीय

नाशिकमध्ये परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त; ५.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

नाशिकमध्ये परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त; ५.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने दादरा नगर हवेली व दिव-दमण येथे निर्मित आणि तेथील विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक करताना मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लाख ७३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार डी-मार्ट मॉलसमोर, मुंबई-आग्रा महामार्गावर, आडगाव शिवार (ता. जि. नाशिक) येथे सापळा रचण्यात आला. यावेळी GJ-05-CH-2112 क्रमांकाची सिल्व्हर रंगाची हुंडाई सेंट्रो ही चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या आढळून आली. वाहन थांबवून तपासणी केली असता मधल्या व मागील सीटमध्ये तसेच डिक्कीत लपवून ठेवलेला मद्यसाठा आढळून आला.
तपासात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला दादरा नगर हवेली व दिव-दमण येथे निर्मित ३० बॉक्स विदेशी मद्य (एकूण २५९.२ लिटर) जप्त करण्यात आले. यासह संबंधित वाहन व एक मोबाईल संच असा एकूण ५,७३,०४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. २१/२०२६ दि. १०/०२/२०२६ नुसार ननकुभाई हमीरभाई बशीया (वय ६७, रा. सर्वे नं. ५८/३, प्लॉट नं. A2-902, एकदंत संस्कृती अपार्टमेंट, उलटन फलिया, सिल्वासा, आमली फुवारा, दादरा व नगर हवेली-३९६२३०) यास अटक करण्यात आली आहे. तसेच वाहनाचा मालक व इतर संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. प्रसाद सुर्वे (सहआयुक्त – अंमलबजावणी व दक्षता), मा. सौ. उषा वर्मा (विभागीय उपआयुक्त, नाशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पी. एम. गौडा, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, किरण धिंदळे, सहायक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान महेश सातपुते, राहुल पवार, विलास कुवर तसेच महिला जवान सुनिता महाजन यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक राहुल मोडक करत आहेत.
दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक याबाबत कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००१९३१ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१९७४४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!