परवानगीशिवाय साखळी बुलडोझरची बोरगावातून घागबारी कडे धाव; राष्ट्रीय महामार्गाला तडे जाण्याचा धोका?
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल
परवानगीशिवाय साखळी बुलडोझरची बोरगावातून घागबारी कडे धाव; राष्ट्रीय महामार्गाला तडे जाण्याचा धोका?
वणी–बोरगाव–सापुतारा या राष्ट्रीय महामार्गावर साखळीचे (चेन) बुलडोझर चालविण्यास परवानगी नसतानाही सर्रास रस्त्यावरून या यंत्रांची वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी महामार्गाच्या डांबरी पृष्ठभागाला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त आरोप स्थानिकांनी केला आहे.
नियमांनुसार साखळी असलेली जड यंत्रे थेट डांबरी रस्त्यावर चालविण्यास मनाई असते. अशा यंत्रांमुळे रस्त्यावरील डांबर उखडणे, पृष्ठभागाला भेगा पडणे तसेच दीर्घकालीन नुकसान होण्याचा धोका वाढतो. मात्र संबंधित कंत्राटदार किंवा मालक यांच्याकडून बुलडोझरची थेट रस्त्यावरून ने-आण केली जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
स्थानिक वाहनचालकांनी सांगितले की, महामार्गावर आधीच काही ठिकाणी किरकोळ तडे दिसू लागले असून भविष्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. “नियम सर्वांसाठी समान असताना अशा प्रकारे उघडपणे नियमभंग होत असताना कारवाई का होत नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग तसेच प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन अशा यंत्रांची थेट रस्त्यावरून होणारी वाहतूक थांबवावी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.



