# काशिसेंबा येथे शेतातील ३ एचपी सौर पंप मोटार चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

काशिसेंबा येथे शेतातील ३ एचपी सौर पंप मोटार चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

काशिसेंबा येथे शेतातील ३ एचपी सौर पंप मोटार चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सुरगाणा  तालुक्यातील काशिसेंबा येथे शेतातील सौर कृषी पंपाची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी जयराम बाबुराव पवार (वय ४३, व्यवसाय शेती, रा. काशिसेंबा, पो. माणी, ता. सुरगाणा, जि. नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या मालकीची ३ एचपी क्षमतेची सौर कृषी पंपाची पाण्याची मोटार अज्ञात व्यक्तीने फिर्यादीची संमती नसताना लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शंकर भोये करत आहेत. पोलिस निरीक्षक विनोद पाटील व पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!