
काठीपाडा येथे बांबू शेतकरी मेळावा उत्साहात साजरा
सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा येथील हॉटेल वनधन येथे मावली कृपा शेतकरी उत्पादक कंपनी, महाराष्ट्र बांबु प्रमोशन फौंडेशन व प्रगती अभियान यांच्या मार्फत बांबू शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र बांबु प्रमोशन फौंडेशन यांच्या यांच्या माध्यमातून सुरगाण्यात मावली कृपा एफपीसीच्या माध्यमातून ‘विखुलेले बांबु बेट व्यवस्थापन व खरेदी विक्री’ हा प्रकल्प चालू असून प्रकल्पातुन शेतकऱ्यांच्या शेतातील बांबु खरेदी केला जात आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बांबू शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र बांबू प्रमोशन फौंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक भास्कर पवार हे उपस्थित होते. बांबु लागवड, बांबू बेटांचे संगोपन व व्यवस्थापन, बांबु खरेदी विक्री, बांबु संदर्भातील शासकीय योजना, नेशनल बांबू मिशन, अटल बांबु समृद्धी योजना व अनुदान अशा अनेक विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच निवृत्ती वन विभाग अधिकारी संजय भंडारी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व बांबु शेती या विषयावर माहिती दिली. तसेच यावेळी बांबु लागवड योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन मावली कृपा कंपनीचे सीईओ प्रशांत चौधरी, ईश्वर गावित, पॅलॅडियम या संस्थेचे समन्वयक योगेश गावित यांनी केले असून या मेळाव्याला बांबु मित्र, बांबु तोड कारागीर, कंपनीचे चेअरमन मानिराम गावित व शेतकरी आबाजी भोये, भारत भोये, व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



