खगोल, वैज्ञानिक प्रयोगाची अनुभूती*
जिल्हा परिषद मार्फत 45 विद्यार्थ्यांच्या मुंबई व पुणे येथे भेट*

*खगोल, वैज्ञानिक प्रयोगाची अनुभूती*
*जिल्हा परिषद मार्फत 45 विद्यार्थ्यांच्या मुंबई व पुणे येथे भेट*
जिल्हा परिषद नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, शिक्षणाधिकारी (प्राथ.) साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप,
संशोधन सहाय्यक अनिता देशमुख यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आविष्कार उपक्रम अभियान अंतर्गत राज्य अंतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद आदर्श शाळा चिंचपाडा (जा) ता.कळवण, जिल्हा परिषद आदर्श शाळा अजंग ता.मालेगाव व जिल्हा परिषद आदर्श शाळा भावली खुर्द ता.इगतपुरी या तीन शाळांची प्राथमिक गटात अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. या शाळेतील 45 विद्यार्थी व 5 शिक्षक यांनी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी मुंबई आणि पुणे येथील स्थळ बघितली. त्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट पुणे, आधुनिक शेती खोदड, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, खडकवासला डॅम, सुनील वॅक्स म्युझियम लोणावळा, सिंहगड, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई मेट्रो, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल व इतर स्थळांना भेटी दिल्या. अभ्यास दौऱ्यातील प्रमुख बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या कार्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. साहेबांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले. अभ्यास दौऱ्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्यात सखोल माहिती जाणून घेतली. अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती, कळवण गटशिक्षणाधिकारी परसराम महाले, विस्तार अधिकारी संजय चौधरी, केंद्रप्रमुख जयराम कुवर, मुख्याध्यापक दिलीप शिसोदे या सर्वांचे सहकार्य लाभले…

