# शेतवस्तीवरील जबरी लुटमार व घरफोडी उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अनेक आरोपी जेरबंद – आवाज जनतेचा
क्राईम स्टोरी

शेतवस्तीवरील जबरी लुटमार व घरफोडी उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अनेक आरोपी जेरबंद

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

शेतवस्तीवरील जबरी लुटमार व घरफोडी उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अनेक आरोपी जेरबंद

नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पेठ व दिंडोरी तालुक्यात घडलेल्या घरफोडी व शेतवस्तीवरील जबरी लुटमारीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.
पेठ पोलीस ठाणे हद्दीतील चिकाडी शिवारात दि. २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ६६,१०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कमलेश लहानु चव्हाण (वय २२, रा. माळगव्हाण, ता. सुरगाणा) व दिगंबर भागवत कहाळी (वय २५, रा. वडपाडा, ता. सुरगाणा) या दोन आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारात दि. २३ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चार आरोपींनी शेतवस्तीवरील घरात घुसून रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली व महिलांच्या अंगावरील दागिने व कपाटातील रोख रक्कम जबरदस्तीने लुटली होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे व आरोपींची कार्यपद्धती यांचा अभ्यास करून पिंपळवाडी (ता. राहाता) परिसरातून एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे समोर आली असून बाबुशा चिंगळया काळे, शुभम चिंगळया काळे, रवि लाल्या भोसले यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे.
यातील काही आरोपींना यापूर्वीच अन्य दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरोधात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिस्खेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर व ग्रामीण चे गुन्हे शाखेचे धनंजय सिलावट व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!