# पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के; सुरगाणा तालुक्यात भीतीचे वातावरण – आवाज जनतेचा
ताज्या घडामोडी

पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के; सुरगाणा तालुक्यात भीतीचे वातावरण

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के; सुरगाणा तालुक्यात भीतीचे वातावरण

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे सुमारे ५.२९ वाजता पहिला हलका धक्का बसला, त्यानंतर ५.३० वाजता दुसरा व अधिक तीव्र धक्का जाणवला. या धक्क्यांची तीव्रता साधारण ४ ते ५ सेकंद इतकी असल्याचे स्थानिकांनी सांगितले.निंबारपाडा येथील युवराज सहारे यांच्या घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. उंबरठाण परिसरातील निंबरपाडा, दातरीचापाडा, कोठुळा, पांगारणे आदी गावांमध्ये या भूकंपाचे परिणाम अधिक जाणवले. काही घरांच्या भिंती व पत्रे हलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक आलेल्या धक्क्यांमुळे अनेक जण घाबरून घराबाहेर धावले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, भूकंपाच्या या अनपेक्षित धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!