# नाशिक–कनाशी बस बंद; बोरगाव परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल बेहाल! – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

नाशिक–कनाशी बस बंद; बोरगाव परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल बेहाल!

आठ-दहा दिवसांपासून सेवा ठप्प; सकाळच्या प्रवासासाठी नागरिकांवर संकट

नेहमीप्रमाणे सुरू असलेली नाशिक–कनाशी ही एस.टी. बस गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्याने बोरगाव व परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सदर बस रोज सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या दरम्यान बोरगाव येथे येत असल्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत सोयीची सेवा होती.
ही बस बंद झाल्यामुळे कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दवाखान्यासाठी नाशिकला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी वाहतुकीची सोय अपुरी असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन नाशिक–कनाशी बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!