मोतीवाला’ निवासी शिबिरातून सुरगाण्यातील २,०६० रुग्णांना लाभ
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

‘मोतीवाला’ निवासी शिबिरातून सुरगाण्यातील २,०६० रुग्णांना लाभ
मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात सात दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केले होते. शिबरात २०६० रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन पोलिस निरीक्षक विनोद पाटील, नायब तहसीलदार सुयोग वाघमारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधव यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि आरोग्य जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात हतरुंडी, अलुंगण, उंबरविहीर, चिकारपाडा, काशीशेंबा, तळपाडा, रानपाडा, उंबरदे, पातळी, पायरपाडा, आमदा, फणसपाडा, वांगण, भोरमाळ, उंबरपाडा, सुरगाणा व पळसन येथे जात विविध सेवा उपक्रम राबवण्यात आले. आरोग्य शिबिरे, शालेय आरोग्य तपासणी, पथनाट्य, जनजागृती रॅली तसेच आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात आले. शिबिरांत २०६० रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला. ११ शाळांतील ४५८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. पथनाट्यांच्या माध्यमातून सामाजिक व आरोग्यविषयक विषयांवर प्रभावी जनजागृती करण्यात आली. सर्वेक्षणांतर्गत रक्तक्षय मूल्यांकन व उपचार, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श जनजागृती, तंबाखू व्यसन प्रतिबंध, मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता, कुपोषण मूल्यांकनाचा समावेश होता. स्वयंसेवकांनी साडेतीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वानंद शुक्ल यांनी शिबिराचे नियोजन केले. प्राचार्य डॉ. एफ. एफ. मोतीवाला, डॉ. सहार मोतीवाला सिंग यांचे मार्गदर्शन तर डॉ. विशाल निंभोरे, डॉ. वैशाली झोडगेकर यांचे सहकार्य मिळाले. डॉ. शर्मिला रॉय, डॉ. अंकिता थेटे, डॉ. विशाल जैन, डॉ. कमलेश बागमार, डॉ. नुजत शेख, डॉ. फरानाज शेख, डॉ. शिवानी पाटील, डॉ. हिमिका भार्गव, डॉ. स्नेहलता जाधव, डॉ. आशा भोसले, डॉ. गायत्री निंभोरे, डॉ. कीर्ती कदम, डॉ. नताशा दिवाणी, डॉ. करिष्मा बेडसे, डॉ. पूनम हिरे यांनी रुग्णांची तपासणी केली.



