# बोरगाव येथील रास्ता रोकोत माजी आमदार जे. पी. गावितांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

बोरगाव येथील रास्ता रोकोत माजी आमदार जे. पी. गावितांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

बोरगाव येथील रास्ता रोकोत माजी आमदार जे. पी. गावितांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

 

आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे मागील चार दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस तीव्र स्वरूप येताना दिसत आहे. तिसऱ्याच दिवशी सोमवारी (दि. १९) रात्री माजी आमदार जे. पी. गावित यांनी थेट आंदोलनस्थळी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात तहसीलदार रामजी राठोड यांच्यासह महसूल, कृषी, पंचायत, वीज महामंडळ, शिक्षण, बांधकाम विभागासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आदिवासींच्या जमीन, वनहक्क, पाणी, वीज, शेती, रस्ते व शासकीय योजनांबाबत माजी आमदार गावित यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अनेक प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नसल्याने त्यांची मोठी दमछाक उडाल्याचे दिसले. चार दिवस उलटूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी माजी आमदार जे. पी. गावित व त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. जिल्हाधिकारी स्तरावरून सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जोपर्यंत आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

मनोरंजनातून प्रबोधन

सुरगाणा व कळवण तालुक्याच्या काही गावातून आलेल्या आदिवासी बांधवांनी बोरगाव येथे चार दिवसापासून ठिय्या मांडला आहे. वेळ जाण्यासाठी अनेक काला पथक या आंदोलनात सहभागी झाले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन झाल्यावर ठाकरनृत्य, तूरनृत्य, पावरी, गावठी तमाशा तसेच संगीताचा तालावर आदिवासी बांधव नृत्य करत आहे. यातून त्यांचा वेळही जात आहे व मनोरंजनातून प्रबोधनही घडत आहे.

 

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!