# छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

महसूल विभाग, तहसील कार्यालय सुरगाणा यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन बोरगाव येथील सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 17 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या अभियानाचा टप्पा क्र. 1 राबविण्यात येत असून, मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सुरगाणा यांनी नागरिकांना तात्काळ, पारदर्शक व नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले होते.
यावेळी बोरगाव, हतगड, सराड, नागशेवडी, शिंदेदिगर आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरास मार्गदर्शक म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण उपविभाग डॉ. कश्मिरा संखे उपस्थित होत्या. तसेच तहसीलदार रामजी राठोड, बोरगाव मंडळ अधिकारी सोनाली कोल्हे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी, महिला बालकल्याण अधिकारी संजय कोंडार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, उप अधीक्षक भुमि अभिलेख भोये, बोरगाव मंडळातील महसूल अधिकारी तसेच तलाठी आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरित जमिनींचे दुरुस्त 7/12 वाटप, “जिवंत 7/12” मोहिमेअंतर्गत नोंदी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचे वितरण, तसेच सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर अनुदान प्राप्त लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले तसेच आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड तसेच माता किटचे वितरण करण्यात आले.
तसेच तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या अकृषिक वापर हस्तांतरणाच्या नोंदी, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आदेशांचे वितरण, प्रलंबित फेरफार प्रकरणांची निकाली काढणी, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत प्रमाणपत्रांचे तात्काळ वितरण, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान तक्रार निवारण यांसह अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्कमार्फत 7/12 वरील चुका दुरुस्त करून सुधारित उतारे देण्यात आले.
या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!