अलंगुण आश्रम शाळेचा कुमार पंढरीनाथ चौधरी महाराष्ट्राच्या खोखो संघात..
नाशिक येथे पार पडलेल्या 19 वर्ष वयोगट शालेये खो- खो क्रीडा स्पर्धेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेच्या *अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगून* तालुका सुरगाणा येथील इयत्ता 12वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी कुमार पंढरीनाथ हिरामण चौधरी राहणार तोरणडोंगरी याची 19 वर्ष वयोगट शालेय खो – खो क्रीडा स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. अलंगून आश्रम शाळेत शिकतांना अभ्यासाबरोबर सकाळ संध्यकाळ अलंगुणच्या मैदाणावर खो- खो खेळाचा कसून सराव करून अलंगुण आश्रमशाळेच्या संघाला तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर पोहचवले,विभाग स्पर्धेत खेळतांना त्याने उत्कृष्ठ बचाव आणि संरक्षण करून संघाला विभाग पातळी पर्यन्त यश मिळवून दिले. नाशिक येथील विभागीय क्रीडा स्पर्धेतही त्याने आपल्या आक्रमक व प्रभावी खेळाने क्रीडा रसिक व क्रीडा पदाधिकाऱ्यांना प्रभावीत करणारा खेळ केला. त्यामुळे त्याची एकोणीव वर्ष वयोगट खोखो स्पर्धेच्या महाराष्ट्र राज्याच्या खोखो संघात निवड झाली आहे.
कुमार पंढरीनाथ चौधरी याची महाराष्ट्र राज्याच्या खोखो संघात निवड झाल्याने, राष्ट्रीय खेळाडूचा सन्मान मिळाल्याने, आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉ जे पी गावित, संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रीय खेळाडू कुमार पंढरी चौधरी आणि क्रीडा शिक्षक श्री निवृत्ती लांडगे , योगेश माळवाळ, रामचंद्र गांगुर्डे व सहकारी क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शालेय स्तरावर कठोर मेहनत घेऊन, क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खोखो खेळाचे धडे गिरवून, शिक्षण संस्थेचे, शाळेचे, सुरगाणा तालुक्याचे, नाशिक जिल्ह्याचे नाव रोशन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…..