आर. आर. आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत सुरगाणा तालुक्यात बोरगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

आर. आर. आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत सुरगाणा तालुक्यात बोरगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक
सुरगाणा : आर. आर. आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगावने प्रथम क्रमांक पटकावून मानाचा बहुमान मिळविला आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास, लोकसहभाग या विविध निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून बोरगाव ग्रामपंचायतीने ही यशाची करंडक आपल्या नावावर केली.
या स्पर्धेचा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, श्री. ओंकार पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक करताना त्यांनी बोरगाव हे गाव विकासाच्या सर्व अंगांनी आदर्श ठरत असल्याचे सांगितले.
या यशामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी हे यश टीमवर्कचे फलित असल्याचे नमूद केले.


