लॉंग मार्च ऐतिहासिक संघर्षयोद्धा….!* *जो लढला…….जो लढतो!* *आणि जो* *अविरतपणे लढत आहे….* ….*कॉ जे पी गावित*

*लॉंग मार्च ऐतिहासिक संघर्षयोद्धा….!*
*जो लढला…….जो लढतो!*
*आणि जो*
*अविरतपणे लढत आहे….*
….*कॉ जे पी गावित*
जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असतांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केलेला सातत्यपूर्ण संघर्ष……..!
संघर्ष हा मानवी जीवनाचा खरा चेहरा असतो. कारण कोणतीही गोष्ट प्राप्त करतांना संघर्ष करावाच लागतो. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण माणसाची कसोटी पाहत असतो त्याचे नाव……संघर्ष,..संघर्ष… आणि संघर्ष…..!
सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कठीण परिस्थितीवर मात करत, संकटांना झेलत, आवाहने पेलत संघर्षातून मार्ग काढणारे व्यक्तिमत्व तसे समाजात फारच कमी असतात…..!
कॉ.जे पी.अर्थात कॉम्रेड जिवा पांडू गावीत हे एक असेच अद्भुआणि अनाकलनीय व्यक्तिमत्व…..! आदिवासी समाज आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कोरलेले एक संघर्षी नाव….!
1972 च्या दुष्काळात पदवीचे शिक्षण घेतलेल्या ह्या एका उच्च शिक्षित युवकाने, नोकरीच्या भानगडीत न पडता समाजसेवेचे व्रत अंगीकारून गोर गरीब आदिवासी बांधवांची सेवा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सुरगाणा तालुका तसा आदिवासी बहुल भाग, गोर गरीब कष्ट करणाऱ्यांचा, डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांचा, रूढी, परंपरा, चालीरिती आणि आंधळ्या अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला होता. शिक्षणापासून तर खुपच दूरवर होता. अशा कठीण परिस्थितीत आदिवासी समाज उभा करने, त्यांना समाज प्रवाहात आनने म्हणजे तारेवरची एक मोठी कसरतच होती. पण संघर्ष हा विचार, संघर्ष हेच कार्य आणि संघर्ष हेच अंतिम ध्येय या विचाराने समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाणे हे मुख्य कर्तव्य समजून लोकांच्या संपर्कात राहणे कॉ जे पी गावितांनी पसंत केले. भेदरलेल्या, घाबरलेल्या आणि साध्या सरळ लोकांना आपलेसे करणे, त्यांच्या सुखदुःखात उभे राहणे, त्यांना अडीअडचणीत मदत करणे, अन्याय अत्याचारविरुद्ध आक्रमक भूमिका घेणे, त्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करणे हे मनापासून सुरु केले. बघता बघता लोकांच्या नजरेत भरणारा, मदत करणारा, गोर गरिबांची कळवळा असणारा आणि अन्याय अत्याचारविरुद्ध संघर्ष करणारा युवक म्हणून समाजात सर्वत्र ओळख निर्माण झाली,
सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर भागात कॉ गोदावरी परुळेकर, कॉ नाना मालुसरे, कॉ रामजी धुळे, कॉ के के पवार अशा समाज सेवकांचा कॉ गावितांना वैचारिक सहवास लाभला, सहवासातून एक उच्च शिक्षित आणि अभ्यासू युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, कॉ. कार्ल मार्क्स कॉ लेनिन, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक साहित्य वाचनाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम झाला. आदिवासी,शेतकरी, शेतमजूर कामगार, कष्टकरी यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी वेळीच ओळखले, जनतेच्या छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी वारंवार संघर्ष करण्याची वेळ येऊ लागली, शासन गोर गरिबांना गृहीत धरते त्यांना गोर गरीब जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. अशा शासनाला धडा शिकवायचा असेल तर, अशा शासनासी संघर्ष करन्यासाठी एक मोठी ताकद उभी करावी लागेल, त्याशिवाय आपण शासनाशी संघर्ष करू शकणार नाही, जनतेला न्याय मिळवू देऊ शकनार नाही. म्हणून त्त्यांनी स्वतः किसान सभेची संघटना मजबूत करण्यास पुढाकार घेलला. जर आपण किसान सभेचे सदस्य वाढवून एक मोठी ताकद उभी केली, संघटन मजबूत केले तर आपले प्रश्न सोडविण्यासाठी किसान सभा हे सर्वात प्रभावी आणि निर्णायक हत्यार बनेल. यासाठी त्यांनी संघटनात्मक काम सुरु केले आणि हळूहळू सुरगाणा पेठ त्र्यंबक तालुक्यात किसान सभा संघटनेची ताकद वाढू लागली.
गोर गरीब जनतेसाठी संघर्ष आणि संघटन करणारा युवक म्हणून कॉ जे पी गावीत जनतेत नावारूपास आले. 1978 मध्ये मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाने त्यांना महाराष्ट्र राज्य विधानसभा लढण्याची संधी दिली. या निवडनुकीत लोकांनी पुढाकार घतला, जनतेने पैसे गोळा करून, स्वतः गावोगावी प्रचार करून कॉ गावितांना मुंबईच्या विधिमंडळात आमदार म्हणून पाठवले, 1978 पासून आतापर्यंत कॉ गावितांनी सात वेळा विधानसभा सदस्य म्हणून सुरगाणा पेठ त्र्यंबक आणि कळवण चे नेतृत्व केले आहे. गेली पन्नास वर्ष जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणारा हा लोकनेता आज वयाच्या 77 व्या वर्षी पन्नास हजार लोकांना बरोबर घेऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी मुंबई विधानभवनावर चालत जातो आहे. जनतेच्या न्याय,bहक्क आणि अधिकारासाठी शासनकर्त्यांना घाम फोडतो आहे. संविधानिक मार्गाचा अवलंब करून शासनकर्त्यांना न्यायासाठी सळो कीं पळो करतो आहे.
गेल्या पन्नास वर्षाच्या काळात कॉ जे पी गावीत यांनी जनतेसाठी वयक्तिक आणि सामुदायिक असे हजारो संघर्ष केले आहेत, जनेसेवेचे व्रत स्वीकारलेला हा लोकनेता गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर कामगार बांधवांसाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगून बाहेर आला आहे. शेकडो केसेस अंगावर झेलून सातत्याने जनसेवा करत आहे, आमदारकीचा वापर करतांना त्यांनी नेहमीच जनहीत जोपासले आहे, पदाचा वापर जनतेसाठी झाला पाहिजे, जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच झाला पाहिजे म्हणून त्यांनी मतदार संघातील हजरो प्रश्न मार्गी लावले आहेत. वनविभाग क्षेत्रातील रस्ते, खेड्यापाड्यावरील वीज, शेती व पिण्यासाठी पाणी, मतदार संघातील आरोग्य व्यवस्था, दळनवळण सुविधा, छोट्या मोठ्या कौटुंबिक, सामाजिक आणि सार्वजनिक योजनांचा गोर गरिबांना मिळवून दिलेला लाभ, यावर भर देऊन मतदार संघातील जनतेला मोठा आधार दिला आहे,गोर गरीब जनतेचा सर्वांगीण विकास केलाआहे. डोंगर दऱ्यातील ग्रामीम भाग हा पूर्णतः आदिवासी भाग असल्याने येथे गरिबीची झळ आरपार होती, गरिबीमुळे शिक्षण घेणे त्यांच्यासाठी खूप दूरवरची गोष्ट होती. येथील आदिवासी बांधव शिक्षणाशिवाय प्रगती करू शकत नाही, म्हणून कॉ गावितांनी 1991 मध्ये आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना केली. निवासी आश्रमशाळा आणि विद्यालय विभागाच्या शाळेतून हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. गेल्या पंचवीस वर्षात हजारो मुलांनी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्याने आज सुरगाणा व शेजारच्या तालुक्यातील हजारो मुलामुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळविल्या आहेत. मोठमोठ्या पदांवर पदाधीकारी झाले आहेत. आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षण मिळावे , युवतीआणि युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार मिळावा, शिकलेल्यांना नोकऱ्या मिळाव्यात, आदिवासी बांधवांचे आरक्षण अबाधित राहावे, आदिवासी भागाच्या पेसा क्षेत्रातील सर्व आरक्षित पदांची भरती करावी, त्यांना कायम करावे, महिलांना, शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळावा, मुलांना, शाळकरी विध्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण मिळावे, व्यापारी व्यावसायिक बांधवांना न्याय मिळावा, सर्व नागरिकांस न्याय, हक्क, अधिकार, स्वातंत्र्य मिळावे. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने संघर्ष करणारा लोकनेता म्हणून संबंध महाराष्ट्र कॉ जे पी.गावितांचा आदर करतो आहे.
2018 पासून तर आत्ताच्या 2026 पर्यंत कॉ जे पी गावितांनी लॉंग मार्चचे नेतृत्व केले आहे. त्यांचे ऐतिहासिक संघर्षी लॉंगमार्च हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, शेतमजूरांना, कामगारांना आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठीच काढलेले आहेत. त्यांनी मुंबईच्या विधानभवनावर पायी लॉंग मार्च काढून देशालाच नव्हे तर जगाला संघर्षाचा एक प्रभावी संदेश दिला आहे. संघर्षातून सर्वच प्रश्न मार्गी लागू शकतात हा एक आदर्श जनतेसमोर उभा केला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने शासनाशी संघर्ष केल्यास जनतेचे प्रश्न सुटतात, संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही, जनतेला संघटित करून आपले प्रश्न सोडविणे हे संघर्षाचे खरे रहस्य आहे. असे जे पी गावीत यांचे प्रामाणिक मत आहे.
गेली पन्नास वर्ष गोर गरीब
आदिवासी बांधवांप्रती स्वतःला वाहून घेणारा, समाज कार्यात स्वतःला झोकून घेणारा, समाजासाठी अविरत लढणारा, जनतेसाठी रस्त्यावर उतरून न्यायासाठी संघर्ष करनारा, वेळ प्रसंगी जनतेसाठी शासनाशी दोन हात करणारा, हा लोकनेता आजही न थकता वयाच्या 77 व्या वर्षीही जनतेच्या शेकडो प्रश्नाचे गाठोडे उरावर बांधून शासनाशी संघर्ष करतो आहे. पायी मुबईकडे चालतो आहे. गोर गरीब जनतेची स्वप्न फुलविण्याचा,गोरगांरिबांची अश्रू पुसण्याचे काम करतो आहे, रंजल्या गांजल्यांना आधार देतो आहे,आणि गोर गरीब आदिवासी फाटक्या तुटक्या बांधवांच्या डोळ्यात आनंद पाहण्यासाठी दिवसरात्र जीवाची पर्वा न करता अविरतपणे संघर्ष करतो आहे……
*असा एकनिष्ठ संघर्ष योद्धा …………. 🙏*
*जो अविरतपणे लढतो……*
*सलाम संघर्ष योध्याला*.
*गोर गरिबांच्या लोकनेत्याला*.
*सलाम कॉ जे पी गावीत साहेबांच्या करायला*.
*त्यांच्या महान…. कर्तृतवाला* सलाम*



