आपला जिल्हाक्राईम स्टोरी
बागलाणमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश

बागलाणमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश
सटाणा शहरात बनावट नोटा चलनाचा प्रकार उघडकीस आला असून सटाणा पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. सटाणा–ताहाराबाद रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या युवकांची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. प्राथमिक तपासात सुमारे १५ हजार रुपयांच्या बनावट नोटा व एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण शिंदे या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



