आपला जिल्हा
डॉ. कश्मिरा संखे यांची कळवण येथे नियुक्ती

डॉ. कश्मिरा संखे यांची कळवण येथे नियुक्ती
शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेच्या (भाप्रसे) अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांची बदली केली असून, त्यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण तसेच सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
याबाबत शासनाच्या सहसचिव उमराणीकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. आदेशानुसार डॉ. संखे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नव्या पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज पदभार स्वीकारला जाणार आहे.
कळवण तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसह उपविभागीय प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



