आपला जिल्हा
उंबरपाडा दिगर येथे भिंत कोसळून 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

उंबरपाडा दिगर येथे भिंत कोसळून 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा दिगर येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत हेमलता माणिक गायकवाड (वय 12) या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. माणिक पुंडलिक गायकवाड यांची मुलगी हेमलता घराच्या भिंतीचा एक भाग कोसळून गंभीर जखमी झाली.
तात्काळ ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या अकस्मात प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांनी कुटुंबीयांना सांत्वन व्यक्त केले असून पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.


