जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सुरगाणा तालुक्यात बोरगाव व सुरगाणा येथे समता सप्ताहानुसार प्रभात फेरी

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सुरगाणा तालुक्यात बोरगाव व सुरगाणा येथे समता सप्ताहानुसार प्रभात फेरी
जागतिक दिव्यांग दिन तसेच समता सप्ताहानिमित्त तालुका सुरगाणा येथे गटसाधन केंद्र, पंचायत समिती सुरगाणा यांच्या वतीने समावेशित शिक्षण अंतर्गत जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. ही प्रभात फेरी जि.प. प्राथमिक शाळा सुरगाणा क्र. 2 व जि.प. प्राथमिक शाळा बोरगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख , शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी , जि.प. प्रा. शाळा सुरगाणा क्र. 2 चे मुख्याध्यापक, बोरगाव व सुरगाणा शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विशेष शिक्षक गणेश पालवे, ललिता आहिरे, मोहन वाघेरे, खरात सर, भोये सर तसेच मदतनीस जाधव मॅडम व चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये समता, संवेदनशीलता आणि समावेशकतेचा संदेश देण्यात आला.



