ऋषीकेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाण्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही-पेन व चिवडा वाटप

ऋषीकेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाण्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही-पेन व चिवडा वाटप
ए.टी. पवार इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा नेते मा. ऋषीकेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सुरगाणा तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वही-पेन व चिवडा साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी, सुरगाणा तालुका यांच्या वतीने राबविण्यात आला.
समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री. दिनेश चौधरी, युवक अध्यक्ष श्री. भास्कर अलबाड, श्री. दीपक खांडवी, श्री. राजू पवार, श्री. सचिन पाडवी, श्री. अशोक बंगाळ यांच्यासह शिक्षकवृंद व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मा. ऋषीकेश दादा पवार यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते, असे मत यावेळी उपस्थित शिक्षकवृंदांनी व्यक्त केले.



