ब्रेकिंग न्यूज, बा-हे वनविभागाची दमदार कामगिरी
गुजरातमधील वनतस्करास १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी धरमपूरमधील सिंगरमाळ येथून पहाटे ताब्यात

गुजरातमधील वनतस्करास १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी
धरमपूरमधील सिंगरमाळ येथून पहाटे ताब्यात
सुरगाणा तालुक्याती बाऱ्हे वनविभागात वृक्षतोडीच्या वेगवेगळ्या चार प्रकरणात हवा असलेला संशयित भरत ऊर्फ गोरख शिवा ढाढर (२६, रा. भानवळ, ता. धरमपूर) यास दिंडोरी न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
गुन्हे वनविभाग व एफडीसीएमच्या संयुक्त पथकाने गुजरातमधील धरमपूर तालुक्यातील सिंगरमाळ येथे लपलेल्या संशयितास मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) पहाटे २ वाजता सापळा रचत ही धडक कारवाई करत ताब्यात घेतले होते. मंगळवारी संशयित भरत ढाढर यास दिंडोरी न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयित आरोपी सासऱ्यांच्या घरात असल्याची गोपनीय माहिती मिळताच बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी तसेच एफडीसीएम वनक्षेत्र पेठच्या थकाने संयुक्तरित्या छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईमुळे संशयितास पळून जाण्याची संधी मिळाली नाही. अटकेनंतर मोठ्या सुरक्षेसह गुजरातहून महाराष्ट्रातील बाऱ्हे वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. आरोपीवर गुजरातमधील चिखलवण, अंभेल, पंगारबारी, वलसाडसह महाराष्ट्रात चार गुन्हे दाखल आहे. बाऱ्हे वनपरिक्षेत्रात दाखल गुन्ह्यात त्यास ताब्यात घेण्यात आले. यासाठी बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कुवर, माया म्हस्के व पेठ येथील एफडीसीएम अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
—



